Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी रंग भरला! सांगलीमध्येही उत्साह टिपेला

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी रंग भरला! सांगलीमध्येही उत्साह टिपेला

कोल्हापुरात पावसाच्या रिमझिममध्ये गणेश विसर्जनाची धूम सुरु आहे. विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी चांगलाच रंग भरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्लीमध्ये केरळच्या पारंपरिक वाद्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धनेर्लीत एका मंडळाकडून केरळच्या पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्याला पथकाला आमंत्रित केलं आहे.

कोल्हापुरात सकाळपासून गणेश मिरवणुकीत ढोल पथकांनी वातावरण निर्मिती केली आहे. बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाने चांगलाच ठेका धरला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. बिनखांबी गणेश मंदिर चौकात ढोल पथकाने चांगलाच ठेका धरला.

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीस थाटात प्रारंभ झाला आहे. मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आजवर आपल्या मिरवणुकीत सातत्याने कोल्हापूरच्या दुखण्यांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाच्या मिरवणुकीत मंडळाची अग्रभागी असलेली मेबॅक कारने चांगलेच लक्ष वेधले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोकपणे बॅनर्सच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी? विचारणा करण्यात येत आहे.

काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी समदं ओके नाही कोल्हापूर. काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीसमोर मेबॅक कार मार्गस्थ झाली असून कोल्हापूरचे प्रश्न घेऊन जात असताना सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सांगलीत मिरज शहरामध्ये स्वागत कमान उभारण्याची परंपरा कायम आहे. गेल्या 40 वर्षांपासून विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य दिव्य स्वागत कमान उभारल्या गेल्या आहेत. यंदा राम मंदिर ,छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक, महिलांचा आदर करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबारातील प्रसंग अश्या वेगवेगळ्या प्रतिकृती स्वागत कमानीवर साकारण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने मिरज शहरातल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी स्वागत कमानी उभारण्याची ही परंपरा आहे. स्वागत कमानीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देखील देण्याची परंपरा आहे.

साताऱ्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनाला सुरवात झाली आहे. साताऱ्यात गणेश विसर्जनाला पावसाने हजेरी लावली आहे. साताऱ्यात 1 लाख 11 हजार घरगुती गणपती आहेत. साताऱ्यात विविध ठिकाणी कृत्रिम तळे उभारण्यात आली आहेत. विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मिरवणुका पाहण्यासाठी गणेश भक्तांची रेलचेल सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. विसर्जनाला प्रारंभ झाल्याने शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -