- तुम्हाला दुप्पट परतावा पाहिजे असेल तर तुम्ही आता पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला या योजनेमध्ये कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना आहे.अशी होईल दुप्पट रक्कम
तुम्ही पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी 5 लाख रुपये जमा केल्यास पाच वर्षांत तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळू शकते, जे 2,24,974 रुपये इतके होईल. अशाप्रकारे तुमचे एकूण ५ लाख रुपये पाच वर्षांत 7,24,974 रुपये होऊ शकतात. परंतु तुम्हाला ही रक्कम आता काढण्याची गरज नाही कारण तुम्हाला त्याची एफडी 5 वर्षांसाठी पुन्हा करावी लागणार आहे.