Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगदोन हजारच्या नोटांना मुदतवाढ? जाणून घ्या सविस्तर वृत्त एका क्लिकवर

दोन हजारच्या नोटांना मुदतवाढ? जाणून घ्या सविस्तर वृत्त एका क्लिकवर

दोन  हजार रुपये मूल्याच्या नोटा बँकेत जमा करण्याची अंतिम मुदत आज, शनिवारी संपणार असली तरी अद्याप तब्बल २४ हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या नसल्याचे स्पष्ट झाले. या परिस्थितीत दोन हजारच्या नोटा परत करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा विचार रिझर्व्ह बँक करत आहे, असे शुक्रवारी सांगण्यात आले. ‘आरबीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अनिवासी भारतीयांनी नोटा जमा करण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे.रिझर्व्ह बँकेने यंदा १९ मे रोजी दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा व्यवहारातून माघारी घेण्याची घोषणा केली होती. बँकेच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २०२३ पर्यंत ३ लाख ६२ हजार कोटी रुपये किंमतीच्या दोन हजारच्या नोटा चलनात होत्या. १९ मेपर्यंत त्यांचे प्रमाण ३.५६ लाख कोटी, तर १ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार ३.३२ लाख कोटींच्या दोन हजारच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या.

म्हणजेच सप्टेंबरपर्यंत एकूण ९३ टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत दाखल झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या नोटा बाहेर आहेत. रिझर्व्ह बँक दोन हजारच्या १०० टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी या नोटा जमा करण्याची मुदत वाढवली जाऊ शकते,.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -