Monday, July 28, 2025
Homeइचलकरंजीकबनूरच्या इसमाचा मृत्यू

कबनूरच्या इसमाचा मृत्यू

 

कोरोची ते हांतकणंगले जाणाऱ्या रोडवर दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या नरेश महादेव कांबळे (वय ५२ रा. कबनूर) यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी ज्योती सुदर्शन कांबळे यांनी शहापुर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, ११ सप्टेंबर २३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता कोरोची ते हातकणंगले जाणाऱ्या रोडवर कोरोची हद्दीत दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये नरेश कांबळे हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना कोल्हापुर सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज ३० सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी अज्ञात मोटारसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -