Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगसणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागले

सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागले

ऑक्टोंबर  महिन्यात दसरा, नवरात्र असे सण साजरे केले जाणार आहेत. या दरम्यान या महिन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.आजपासून, व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

 

नवीन दर रविवारपासून म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत. दरम्यान या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जात आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्याची सुरूवातच महागाईत वाढीसोबत झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात दसरा आणि नवरात्र यासारखे उत्सव साजरे केले जातात, मात्र यापूर्वीच कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. दिल्ली, कोलकता, चेन्नई या ठिकाणी ही दरवाढ लागू असणार आहे.सप्टेंबरमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमती कमी करम्यात आल्या होत्या. मात्र सप्टेंबरमध्ये 157 रुपयांनी स्वस्त करण्यात आलेले सिलिंडर दर आता त्याच्यापेक्षाही जास्त वाढवण्यात आले आहेत.

 

कोलकाता येथे एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,636.00 रुपयांऐवजी 1,839.50 रुपयांना खरेदी करावा लागणार. तर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 204 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत 1,482 रुपयांवरून 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

 

तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1,695 रुपयांवरून 1898 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जाणार आहे. घरगुती गॅसच्या किमतीत दिलासा

 

ऑगस्ट महिन्यांत सरकारने सामान्य लोकांना महागाईपासून दिलासा देत 14.2 किलोच्या व्ययंपकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यानंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची खिंमत 1103 रुपयांवरून कमी होऊन 903 रुपये झाली आहे. त्यामुळे सर्व शहरात सिलिंडरच्या किमती 200 रुपये कमी झाल्या होत्या. यासोबतच उज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी सब्सिडी देखील 400 रुपये करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -