ताजी बातमी ऑनलाईन टीम
दिवसेंदिवस नात्यांमध्ये पडत जाणारे अंतर खूपच वाढू लागले आहे. यामुळे आई वडील, आजी आजोबा, भाऊ-बहीण अशी जवळची नाती दुरावत चालली आहेत. अशी आपली जवळची काही लांबची नाती आपणाला चांगल्या पद्धतीने जपता आली पाहिजेत असा आदर्श घालून देण्याचे शिक्षण मुसळे बाल विद्यामंदिरात आजी आजोबा दिवस साजरा करून देण्यात आले.
नुकताच तात्यासाहेब मुसळे शाळेमध्ये आजी आजोबा चा दिवस हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये आजी आजोबा दिवस म्हणून विद्यार्थी वर्गाला आपल्या आजी आजोबांच्या बद्दल माहिती सांगितली. आजी आजोबा बद्दलचे नाते जपता यावे या उद्देशाने शाळेकडून हा उपक्रम राबविण्यात आला . यामध्ये विद्यार्थी वर्गाकडून तसेच पालक वर्गाकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांचे आजी आजोबा देखील सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात मनोरंजनासाठी स्पॉट्स गेम, गौरी गणपतीची गाणी, उखाणे तसेच अनेक अनोखे गेम आणि नृत्य सादर करण्यात आले. तर विद्यार्थ्यांचे आजी आजोबा पारंपारिक वेशात सहभागी झाले होते.
सदर उपक्रमास अध्यक्षा मुसळे विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.व्ही.एस. काडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.