चार दिवसांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीतून घरी परतल्यानंतर तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यात घडली. अभिजित महादेव सावंत (वय 32) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अभिजितच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. तो एकुलता एक होता. मिरवणूक पार पडल्यानंतर घरी जेवण झाल्यानंतर अभिजितच्या डोक्यात अचानक कळा सुरू झाल्या. त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केल्यानंतर मेंदूतील रक्तस्रावाचे निदान झाले. त्याला उपचारासाठी कोल्हापुरात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.