Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंगआजपासून नवा बदल! जन्माचा दाखला असणार महत्त्वाचा पुरावा

आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला असणार महत्त्वाचा पुरावा

 

 

1 ऑक्टोबरपासून देशभरात बर्थ सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट्स होणार आहे. या बदलामुळे आता तुम्हाला आधार कार्ड , पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ते अगदी मॅरेज सर्टिफिकेटपर्यंत यासारख्या कोणत्याच कागदपत्राची गरज लागणार नाही. ‘जन्म आणि मृत्यू पंजीकरण अधिनियम 2023’ अंतर्गत हा बदल करण्यात आलाय.

 

एक वर्षांपर्यंतच्या बाळाचा दाखला

नवजात किंवा एक वर्षापर्यंतच्या मुलाच्या जन्मावर, महानगरपालिकेच्या झोन कार्यालयातून जन्म प्रमाणपत्र जारी केले जाते. यासाठी रुग्णालयात किंवा घरी जन्म झाल्यास संबंधित झोनमध्ये अर्ज करण्याचा नियम आहे. रुग्णालयात जन्मलेल्या मुलाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रुग्णालय ज्या झोन कार्यालयात येते त्या कार्यालयात अर्ज करावा लागेल. जर मुलाचा जन्म घरी झाला असेल, तर घर ज्या झोनमध्ये आहे तेथे अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर, ते जन्म प्रमाणपत्राच्या

https://crsorgi.gov.in/web/index.php/auth/login वेबसाइटवर सर्व कागदपत्रे अपलोड करेल. तेथून जन्म प्रमाणपत्र जारी केले जाते जे संपूर्ण भारतात वैध आहे. हे प्रमाणपत्र कुठूनही छापले जाऊ शकते. जन्म दाखला मिळवण्यासाठी, कोणीही

https://crsorgi.gov.in/web/index.php/auth/login या वेबसाइटवर थेट अर्ज करू शकतो.

 

काय असते बर्थ सर्टिफिकेट

बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला असे कागदपत्र आहे. ज्यामध्ये बाळाच्या जन्माचे स्थान, लिंग आणि अन्य महत्त्वाची माहिती जशी की, आई-वडिलांची नावे यासारखी माहिती असे. याद्वारे बाळाची ओळख होऊ शकते. बाळाकडे आधार कार्ड असल्यावरही जन्माचा दाखला अत्यावश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -