शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आता वेग आल्याचे दिसून येत आहेत. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रकही ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ आज नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधीमंडळ सूत्रांकडून देण्यात आली आहे.राज्यात सत्तांतर होऊन एक वर्ष पुर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आत्तापर्यंत प्रत्यक्षात आमनेसामने आलेले नाहीत. विधीमंडळाच्या कार्यवाहीनिमीत्त ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तर ते एकमेंकासमोर आल्यानंतर काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुरावे सादर करताना शिंदे आणि ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. जुलै 2022 मध्ये नेमकी शिवसेनेची सुत्रे कोणाच्या हातात होती? हे तपासले जाणार आहे. यासंबधीचे वृत्त टसाम टिव्ही’ने विधीमंडळ सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.