बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 439 जागांसाठी भरती (SBI Recruitment 2023) जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर व सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर अशा महत्त्वाच्या पदांकरिता भरती काढण्यात आलेली आहे. जर तुमचे वय शिक्षण आणि पात्रता या पदांकरिता योग्य असेल तर तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर 2023आहे. चला तर मग जाणून घेऊया या पुढील पदांकरिता आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी बद्दल..
काय आहे पात्रता – SBI Recruitment 2023
असिस्टंट मॅनेजर – अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बी टेक, एम टेक, एमएससी शिक्षण पूर्ण केलेले असावे तसेच या पदाकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया ने एकंदरीत 335 जागा काढलेल्या आहेत. या उमेदवारांचे वय 32 ते 45 वर्ष असावे. असेच उमेदवार वरील पदाकरिता अर्ज करू शकता. तुम्ही 6 ऑक्टोबर 23 पर्यंत वरील पदाकरिता अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देणे गरजेचे आहे. तेथे तुम्हाला सर्व तपशील पाहायला मिळेल.
मॅनेजर-
या पदाकरिता देखील भरती काढलेली आहे. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण बी ई, एम टेक, एम एस सी शिक्षण पूर्ण केलेले असावे. ही अट अनिवार्य आहे. मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 ते 45 वर्ष असावे. या पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची संधी 6 ऑक्टोबर पर्यंत आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
डेप्युटी मॅनेजर –
स्टेट बँक ऑफ इंडिया ने तरुणांसाठी डेप्युटी मॅनेजर या पदाकरिता देखील भरती काढलेली आहे. एकंदरीत ८० जागा करिता ही भरती निघालेली आहे. या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण बी ई, एम टेक एम एस सी शिक्षण पूर्ण केलेले असावे.
सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर-
स्टेट बँक ऑफ इंडिया ने सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर या महत्त्वाच्या पदाकरिता देखील बंपर भरती काढलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकंदरीत 7 जागा वरील पदाकरिता शिल्लक आहे उमेदवाराचे शिक्षण वरील पदांसाठी जे आहे तेच शिक्षण या पदाकरिता देखील लागू करण्यात आलेले आहे. वय वर्ष 32 ते 45 असणारे उमेदवार या पदाकरिता अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहे. कोणत्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई, हैद्राबाद, चंदिगढ, बंगळुरू
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – http://sbi.co.in