आता मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधांबाबत जे करावे लागणार ते मी करणार. त्याचाच भाग म्हणून इचलकरंजीकराना दोन वेळचे मुबलक आणि शुध्द पाणी पिण्यासाठी देणे ही सुध्दा माझी जबाबदारी आहे. याची जाणींव मला आहे. त्यामुळे सूळकुड शिवाय अन्य पर्ययाने इचलकरंजी वासियांना शुद्ध पाणी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
सूळकुड योजनेबद्दल काय भूमिका या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल दिली. त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण मुक्ती, अद्ययावत हॉस्पिटल खंडपीठ, थेट पाईपलाईन, त्याशिवाय करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, शाहू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय धरतीवरती शाहू स्मारक सर्व प्रश्नांची त्यांनी यावेळी सांगितले. झाल्यानंतर पालकमंत्री म्हणून नियुक्ती विश्रामगृहावर आयोजीत पहिल्याच शासकीय पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी या महिन्यात होत असलेल्या शाही दसऱ्याच्या आयोजनाबाबत माहिती दिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकत्वाची धूरा आलेली आहे. लोकांच्या खुप अपेक्षा आहेत आणि ते स्वाभाविक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने कोल्हापूरसाठी आहे.
त्याचाच भाग म्हणून विकासात्मक भूमिका घेतली
अजितदादा पवार यांची सभेत केलेली आयटी पार्कची मागणीवर काम सुरू झाले आहे. शेंडा पार्कमधील ३० एकर जमिन त्यासाठी आता विनामोबदला मिळणार आहे. निधीची घोषणा झाली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विस्तारित सहकार परिषद होत आहे. शिवाय इमारतीच्या उदघाटनच्या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने कोल्हापुरात अकराशे बेडचे अद्यावत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.