Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरअंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; शिखरांसह परिसरात स्वच्छता मोहीम, दर्शनरांगेत केला बदल

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; शिखरांसह परिसरात स्वच्छता मोहीम, दर्शनरांगेत केला बदल

 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात स्वच्छता मोहिमेला  प्रारंभ झाला. मुंबईतील आय स्मार्ट फॅसिटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मंदिरातील स्वच्छतेला सुरुवात झाली.सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते स्वच्छता साहित्याचे पूजन करण्यात आले. यानंतर मंदिराची शिखरे, मुखदर्शनाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, शेतकरी संघाच्या इमारतीतही दर्शनरांग उभारण्यात आली आहे.एकावेळी साडेतीन हजार भाविक दर्शनरांगेत मावतील, अशी व्यवस्था फक्त शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर सीसीटीव्ही कंट्रोल रूम होणार आहे. जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे वॉच राहील. शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना आराम करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याबरोबरच हिरकणी कक्षही उभारला आहे.दोन्ही दर्शनरांगांची क्षमता पाच हजारांवरशेतकरी संघातील दर्शनरांग व सरलष्कर भवनजवळील दर्शनरांग अशा दोन्ही दर्शनरांगा मिळून एकावेळी सुमारे पाच ते साडेपाच हजार भाविक दर्शनासाठी थांबू शकतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात गर्दी वाढल्यानंतर दर्शनरांग छत्रपती शिवाजी चौकापर्यंत पोहोचते. यंदा वाढवलेल्या दर्शनरांगेमुळे भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन घेता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -