Sunday, August 3, 2025
Homeइचलकरंजीफेरीवाल्यांच्या विरोधामुळे अतिक्रमण मोहिम थांबविली!

फेरीवाल्यांच्या विरोधामुळे अतिक्रमण मोहिम थांबविली!

इचलकरंजी, शहरात अतिक्रमण विरोधात कारवाई करतांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला फेरीवाल्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे गुरुवारी अतिक्रमण विरोधातील मोहिम थांबवण्याची वेळ आली. केवळ विविध आस्थापनांनी रस्त्यावर ठेवलेले २५ स्टॅन्ड बोर्ड जप्त केले.

गेल्या तीन दिवसांपासून शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.

 

अनेक भागात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांच्या विविध माध्यमातून तक्रारी आल्यानंतर कारवाईला वेग आला होता. मात्र आज या कारवाईत अडथळा निर्माण झाला. राजर्षी शाहू पुतळा येथील सिग्रल परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण दूर करण्यासाठी गुरुवारी पथक केले. मात्र तेथे मोठ्या संख्येने फेरीवाले

जमल्याने कारवाई करण्यावर मर्यादा पडल्या. तेथील मोहिम गुंडाळण्यात आली. त्यानंतर स्टेशन रोडवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र तेथेही विरोधांमुळे कारवाई करता आली नसल्याचे अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी सांगीतले. दरम्यान, शहरातील अतिक्रमण निर्मुलन मोहिम अधिक तीव्रपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. अतिक्रमणाच्या विरोधातील मोहिम यापुढेही कायम सुरुच राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -