Saturday, July 27, 2024
Homenewsयावर्षीही नवरात्रीत गरबा-दांडिया नाही, पालिका प्रशासनाने जाहीर केली नियमावली!

यावर्षीही नवरात्रीत गरबा-दांडिया नाही, पालिका प्रशासनाने जाहीर केली नियमावली!


गणेशोत्सवापाठोपाठ (Ganeshotsav 2021) यावर्षी नवरात्रोत्सव (navratri utsav 2021) देखील साधेपणाने आणि कोरोनाच्या (Corona Virus) नियमांचे पालन करत साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. कोरोनाचा (Covid-19) वेग मंदावला असला तरी सुद्धा मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशामध्ये मुंबई महानगर पालिकेने (BMC) पुढच्या आठड्यापासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी कोरोना खबरदारीची नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवाला देखील काही नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे.

मुंबई महानगर पालिका उपायुक्त हर्षद काळे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त नियमावलीचे परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, नवरात्रोत्सवात सर्व सार्वजनिक मंडळांच्या देवीच्या मूर्ती 4 फूटांच्या असतील तर घरगुती उत्सवासाठी 2 फुटांच्या मूर्ती असतील. मास्कचा वापर (Use Mask), सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशनसह ( safe spacing and sanitation )सर्व प्रकारची कोरोना खबरदारी घ्यावी आणि गरबा-दांडियाचे (Garba- Dandia) आयोजन न करता आरोग्य आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

यावर्षीच्या नवरात्रोत्सवावर देखील कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना खबरदारी घेऊन सण साजरा करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक उत्सवासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी ऑनलाईन (Permission online) आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाशुल्क देण्यात येणार आहे. उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्याचसोबत, गर्दी टाळून, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझेशनची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे नाही तर साथरोग कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पालिकेने सांगितले आहे.

– आरोग्य, रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.
– मंडपाच्या मुख्य द्वाराचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
प्रसाद वाटणे, फुलं अर्पण करणे टाळावे.
– आगमन- विसर्जनाला दहापेक्षा जास्त जण जाऊ नये.
– मंडप आवारात हार, फुलं, प्रसाद विक्री स्टॉल नसावे.
– मंडपात एकावेळी दहा जणांपेक्षा जास्त गर्दी नसावी.
– विसर्जन स्थळी मूर्ती विभाग कार्यालयाकडे जमा करावी.
– पंटेमेंट झोनमधील मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणू नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -