इचलकरंजी;-
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा व दगडूलाल मर्दा सी एस आर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या सहकार्याने मोफत हृदयविकार तपासणी व मोफत अन्जीयोग्रफी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार 28 व रविवार 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या शिबिरात नामवंत तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत व दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा यांनी केले आहे.
आज एकविसाव्या शतकात आपल्या जीवनात रोजची धावपळ गडबड स्पर्धा चिंता ताण तणाव या गोष्टी नित्याच्या होऊन गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्यात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा परिस्थितीत घराघरात कळत नकळत कोणीही विशेषता कर्त्या व्यक्तीने जरी गाफिल राहिले तरी हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वेळीच याबाबत निदान झाल्यास तात्काळ उपचार करणे शक्य आहे. आपल्या परिवारातील कोणालाही हृदयविकार, उच्च रक्तदाब असल्याची शंका असेल तर वेळीच आणि तपासणी आणि औषधोपचार व्हावेत हे या शिबिरा मागचे उद्दिष्ट आहे.
या शिबिरात प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. कृष्णकुमार धूत, डॉ.रोहन सोनवणे, डॉ.अमोल भोरे,डॉ. अमित जोशी डॉ.अभयकुमार कुडचे डॉ.सम्युवेल भंडारे, डॉ.सी पी पाटील डॉ.संचिता काजवे डॉ.श्रीधर जाधव डॉ.पदमज बडबडे हे तपासणी करणार आहेत.या शिबिरात रक्त तपासणी, इसीजी ,बी एम आय, लिपिड प्रोफाइल, टी एम टी व अँजिओग्राफी मोफत करण्यात येणार आहे. छातीत दुखणे श्वास घेताना त्रास होणे अनियमित ह्रदय ठोके जिना चढताना अथवा उतरताना धाप लागणे अथवा घाम येणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा शिबिरासाठी नाव नोंदणीची मुदत 25 ऑक्टोंबर पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी मदन गोरे – 8928736999,राधेश्याम भुतडा-9422419208, सरस्वती हाऊस, कागवाडे मळा,इचलकरंजी फोन 0230-2431287 व महेश सेवा समिती दातेमळा फोन 0230- 2433438 या ठिकाणी नोंदवावीत असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत, सचिव लालचंद गट्टाणी, दगडूलाल मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा व प्रोजेक्ट चेअरमन राधेश्याम भुतडा यांनी केले आहे.या वेली प्रोजेक्ट कमेटी सदस्य लक्ष्मीकांत मर्दा, मुकेश खाबाणी,बजरंग काबरा,बालकिशन टुवाणी,आनंद बांगड, सुशील ईनाणी, मनोज राठी,शिवप्रसाद तापडिया,सुनील मुंदडा, रसिक आगीवाल, दिलीप बजाज, लक्ष्मीकांत बलदवा,मदन गोरे(एलायंस) उपस्थित होते