Saturday, August 2, 2025
Homeसांगलीएमआयडीसीत गोदाम फोडून साहित्याची चोरी, विटा पोलिसांकडून चौघांना अटक; ७ लाखांचा मुद्देमाल...

एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्याची चोरी, विटा पोलिसांकडून चौघांना अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त



खानापूर तालुक्यात एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्य चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, एक मारूती कार, स्क्रॅप असा सहा लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगलीच्या (Sangli) खानापूर तालुक्यातील कार्वे येथील एमआयडीसीत गोदाम फोडून साहित्य चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला अटक करण्यात आली. आहे. कार्वे येथील एमआयडीसीतील गोदामातून दीड लाखांच्या बॅगा चोरल्याची रोहित जाधव यांनी फिर्याद दिली होती.

यानंतर संशयितावार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य, एक मारूती कार, स्क्रॅप असा सहा लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या टोळीकडून चोरीचा ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी चार गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. आकाश विजेश गोसावी (वय २५), रविंद्र तुकाराम गोसावी (वय ३३), विनोद रामप्पा गोसावी (वय ३०), अनिल रामप्पा गोसावी (वय २५, सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -