Wednesday, August 6, 2025
Homeसांगली८ लाखांची उचल घेऊन ऊसतोड मुकादमाची फसवणूक; १३ जणांवर गुन्हा दाखल

८ लाखांची उचल घेऊन ऊसतोड मुकादमाची फसवणूक; १३ जणांवर गुन्हा दाखल

 

गुळवंची (ता.जत) येथील ऊसतोड मुकदमाने ऍडव्हान्स मध्ये ऊस तोडीसाठी ८ लाख २० हजार इतकी उचल दिली होती. उचल घेऊनही ऊस तोडीस न आल्याने व पैशाची परतफेड न केल्याने १३ जणांवर फसवणुकीचे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.याबाबतची फिर्याद उत्तम देवाप्पा कोळेकर (रा. गुळवंची) यांनी जत पोलिसांत दिली.

 

फसवणूक केल्याप्रकरणी सुहास आनंदराव कांबळे, अशोक भिवा ढाळे, विकास श्रीकांत माने, अमर अशोक लोंढे, अविनाश अशोक जाधव, अंबाजी हिंदुराव वाघमारे, तानाजी हिंदुराव वाघमारे, संतोष दुर्योधन कांबळे, प्रकाश महादेव भोसले, संजय दगडू कांबळे, सतीश शामसन कांबळे, चंदन बाबासो वायदंडे, सुरेश विश्वनाथ सकट सर्व (रा.देशिंग, ता. कवठेमहंकाळ) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, ऊसतोड मुकादम म्हणून उत्तम कोळेकर यांचा व्यवसाय आहे. त्यांनी देशिंग येथील १३ जणांना ऊस तोड मजूर म्हणून येण्यासाठी ॲडव्हान्समध्ये ८ लाख २० हजार रुपये दिले होते. ही रक्कम ५ जुलै २०२२ रोजी देण्यात आली होती. ऊसतोड सुरू झाल्यानंतर संबंधित उचलधारकांना कामावर येण्यास सांगितले होते. परंतु सर्व संशयित आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कामावर येत नसल्याने व ऊस तोडीसाठी दिलेली रक्कम परत द्यावी.अशी मागणी केली. दोन्हीही बाबींना जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली.मुकादम उत्तम कोळेकर यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

फसवणुकीच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ

 

जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचे वाढते प्रकार घडत आहेत. तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. गेल्या वर्षभरात जत पोलिसात वेगवेगळ्या फसवणुकीच्या घटना वारंवार घडल्या आहेत परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास लावण्यात जत पोलीस अपयशी ठरत आहे. आरोपीवर पोलिसाचा कोणताही धाक राहिला नाही. यामुळेच गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यात सर्वसामान्य लोक भरडले जात आहेत. फसवणुकीच्या तपासात तसेच चोरीच्या गुन्हात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. जनतेतून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -