Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात कोहलीचे 'विराट' कटआऊट

कोल्हापुरात कोहलीचे ‘विराट’ कटआऊट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : स्वर्गीय राणा गायकवाड स्पोर्टसच्यावतीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त भारताचा माजी कर्णधार व
स्टार खेळाडू विराट कोहलीचे १५ फुटी कटआऊट उभे
करण्यात आले आहे. याचे उदघाटन ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी झाले.

कोल्हापूरनगरी फुटबॉल पंढरी म्हणून सर्वत्र गणली जाते. यात परदेशी खेळाडू मेस्सी, नेमार, रोनॉल्डो यांची छायाचित्रे व कटआऊट उभी केली जातात. तर क्रिकेटपटू तेही भारतीय स्टार खेळाडूंचीही उभी करून नवीन प्रथा सुरु करून खेळाला प्रोत्साहन द्यायचे या उद्देशाने या संघासह इतर संघातील खेळाडूंनी हे १५ फुटी कटाआऊट उभे केले आहे. या कटाआऊट उदघाटनप्रसंगी सचिन थोरात, महेश गुरव, भगवान सरनोबत, शामराव पाटील, संदीप कोठावळे, संदीप पाटील, गिरीश पेडणेकर, शेखर पोतदार, आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा अन् सर्वाधिक ११३ फिफ्टी + धावांचा विक्रम आता विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांची संख्या ४६ वर पोहोचवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -