ताजी बातमी ऑनलाईन टीम
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आमने-सामने आहेत. काँग्रेसने विश्वासात न घेता उमेदवारांची यादी जाहीर केल्याने समाजवादी पार्टी नाराज आहे. समाजवादी पार्टीने मध्य प्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवरुन INDIA आघाडीतील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. यूपीएमध्ये INDIA एलायंस जवळपास तुटल्यात जमा आहे. गुरुवारी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठ वक्तव्य केलं. “मध्य प्रदेशात समाजवादी पार्टीला जी वागणूक मिळाली, तसाच व्यवहार उत्तर प्रदेशात होईल” असं अखिलेश यादव म्हणाले. मध्य प्रदेशात समाजवादी पार्टीला काँग्रेसने मूर्ख बनवलं. आमच्यासोबत धोका झाला. रात्री एक वाजेपर्यंत बैठक चालली. पण दुसऱ्यादिवशी यादी जाहीर झाली, त्यात आम्हाला एकही सीट मिळाली नाही. काँग्रेसचे लोक भाजपाला मिळालेले आहेत.
“काँग्रेसच्या चिरकूट नेत्यांची काय औकात आहे, जे त्यांच्याबद्दल बोलतील” असं अखिलेश यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन INDIA आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टीसह अन्य पक्ष या विरोधी पक्षाच्या आघाडीत आहेत. पण विधानसभा निवडणुकीपासून INDIA आघाडीत मतभेद दिसू लागले आहेत. खासकरुन मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमधील अंतर स्पष्टपणे दिसून आलं.
‘प्रत्यक्ष निकाला आला, तेव्हा…’
“काँग्रेस पक्षाचा कुठला नेता बोलतोय? एमपीच्या माजी मुख्यमंत्र्यांने बैठक बोलावली. समाजवादी पार्टीचे नेते तिथे गेले. समाजवादी पार्टीने एक ते दोन जागा जिंकल्या होत्या. सगळी चर्चा झाली. काँग्रेस नेत्यांना यादी दिली. एक वाजेपर्यंत समाजवादी पार्टीचे नेते जागे होते. त्यांनी आकडे पाहिले. सहा जागांवर विचार होईल, असं आश्वासन दिलं. प्रत्यक्ष निकाला आला, तेव्हा समाजवादी पार्टीला शून्य जागा मिळाली” असं अखिलेश यादव म्हणाले.