Saturday, July 5, 2025
HomeइचलकरंजीIchalkaranji ; हिसडा मारून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

Ichalkaranji ; हिसडा मारून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पहाटेच्या सुमारास फुले तोडत असताना अज्ञात चोरट्याने हिसडा मारून सुमारे ५० हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र लंपास केले. सदरची घटना महेश हौसिंग सोसायटी यशवंत कॉलनी येथे घडली. याबाबतची वर्दी पार्वती अशोक डागा (वय ४२) या महिलेने शिवाजीनगर पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पार्वती डागा या महिला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरासमोरील
झाडावरची फुले तोडत असताना पाठीमागून येऊन एका अज्ञात
चोरट्याने हिसडा मारून ५० हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र लंपास केली. तसेच सदरप्रसंगी आपणास मारहाणही केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -