Friday, July 4, 2025
Homeब्रेकिंगVIDEO: "मला बोलू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल" जरांगे पाटलांच्या सभेत तरुणांचा...

VIDEO: “मला बोलू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल” जरांगे पाटलांच्या सभेत तरुणांचा गोंधळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शेलपिंपळगाव (पुणे) : राजगुरूनगर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सभा झाली. जरांगे पाटील शुक्रवारी (दि. २०) राजगुरूनगर येथे आले असता सभा संपल्यानंतर एका तरुणाने स्टेजवर येत माईक हातात घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

जालना येथील सुनील कावळे या तरुणाने मुंबई येथे गुरुवारी (दि. १९) आत्महत्या केली. या तरुणाला तसेच मराठा आंदोलनादरम्यान ४७ पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. मराठा समाजाला शांततेत आंदोलन करून आरक्षण मिळवून देण्याचा शब्द देत मनोज जरांगे पाटील यांनी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले.

त्यानुसार सभा संपल्यानंतर सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभे राहिले असताना एक तरुण अचानक स्टेजवर आला. जरांगे पाटील यांच्या हातातील माईक आपल्या हातात घेऊन त्याने आपल्याला बोलायचे आहे असा आग्रह केला. मात्र सभा संपल्याने आयोजकांनी त्याला बोलू दिले नाही. त्यावरून त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -