ताजी बातमी ऑनलाईन टीम
हार्ट अटॅकच प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललय. दर दिवशी अचानक कोणाला तरी हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या कानावर पडतायत. मैदानी खेळ खेळताना किंवा डान्स करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. सध्या नवरात्री सुरु आहे. यावेळी गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्याच प्रमाण वाढलय. गुजरातमध्ये गरब्या दरम्यान 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबाबतीत हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट दोन्ही गोष्टी एकाचवेळी झाल्या. चिंताजनक म्हणजे गरबा खेळताना हार्ट अटॅक आल्याने एका 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पण असं का होतय? कमी वयात हार्ट अटॅकने मृत्यू होतोय. खासकरुन डान्स करताना तसच गरबा खेळताना असं का होतय? हे आपण एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊया.
राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये कार्डियोलॉजी डिपार्टमेंटमधील डॉ. अजित जैन Tv9 शी बोलताना म्हणाले की, “मागच्या तीन वर्षात हार्टच्या आजाराच प्रमाण वाढत चाललय. खाण्यापिण्याच्या सवयी, खराब लाइफस्टाइल आणि कोरोना व्हायरसने ह्दयाला कमजोर बनवलय. कोविड व्हायरसमुळे अनेकांच्या ह्दयाच्या नसांमध्ये ब्लड क्लॉट तयार झाले आहेत. त्यामुळे हार्ट अटॅकच प्रमाण वाढलय”
गरबा खेळताना लोक नाचतात. हे एक फिजिकल वर्क आहे. या दरम्यान शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढते. ऑक्सिनजच्या अधिक मागणीमुळे लंग्सच काम वाढतं. त्याचा थेट परिणाम हार्ट फंक्शनवर होतो. हार्ट वेगाने ब्लड पंप करायला सुरुवात करतो. त्यामुळे ह्दयावर प्रेशर वाढतं.
त्या स्थितीत काही मिनिटात ट्रीटमेंट आवश्यक
हार्टच्या नसांमध्ये आधीपासूनच क्लॉट असतात. त्यात जास्त ब्लड पंप केल्यामुळे हार्ट योग्य पद्धतीने ब्लड पंप करत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येतो. काही प्रकरणात ह्दय अचानक काम करण बंद करतं. ते कार्डियक अरेस्टमुळे होतं. कार्डियक अरेस्ट एक खतरनाक स्थिती आहे. यात काही मिनिटात ट्रीटमेंट मिळाली नाही, तर रुग्णाचा मृत्यू होतो.
गरबा खेळताना का येतो हार्ट अटॅक?, एक्सपर्ट्सच काय म्हणणं?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -