Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगवाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे निधन…मॉर्निंग वॉक करताना कुत्र्यांनी केला...

वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचे निधन…मॉर्निंग वॉक करताना कुत्र्यांनी केला होता हल्ला

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघ बकरी चहा समूहचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगत आणि सामाजिक क्षेत्रासही धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि बेटी परीशा असा परिवार आहे. मागील आठवड्यात त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना ब्रेन हेमरेज झाला होता आणि ते रुग्णालयात होते. अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. पराग देसाई हे वाघ बकरी चहा समूहाच्या सहा संचालकांपैकी एक होते.

काय घडली होती घटना
पराग देसाई नेहमी मॉर्निंग वॉकला जातात. १५ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे इस्कॉन अंबली रोडवर मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्लापासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा पाय घसरला. त्यात ते खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर झायडस रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

आयलँडमधून एमबीए…अन् कंपनीची जबाबदारी
पराग देसाई यांनी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेतले. त्यांनी लॉन आयलँड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. 1995 पासून ते कंपनीत सक्रिय होते. त्यांनी कंपनीची जबाबदारी घेतली तेव्हा कंपनीची उलाढाल 100 कोटींपेक्षाही कमी होती. त्यांच्याकडे विक्री, विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांनी बदल करत कंपनीस भरभराटीस नेले. सध्या या कंपनीची वार्षिक उलाढाल 2 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. भारतात सर्वत्र त्यांचे उत्पादन उपलब्ध आहे. जगातील 60 देशांमध्ये त्यांच्या उत्पादनाची निर्यात होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -