Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगशिल्पा विद्यार्थी शकीलच्या प्रेमात पडली, मग नवऱ्याला संपवण्यासाठी असं रचल भयंकर कारस्थान

शिल्पा विद्यार्थी शकीलच्या प्रेमात पडली, मग नवऱ्याला संपवण्यासाठी असं रचल भयंकर कारस्थान

कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर सूत जुळल्यानंतर एका महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. या महिलेच लग्न झालं होतं. तिच नाव शिल्पा खेमका आहे. कोचिंग क्लासला येणारा विद्यार्थी मोहम्मद शकीलवर तिचा जीव जडला. दोघे परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडाले. शिल्पाला, तर आपला नवरा, कुटुंब आहे याचा सुद्धा विसर पडला. शिल्पा मोहम्मद शकीलच्या प्रेमात इतकी बुडाली की, नवऱ्याचा तिला अडसर वाटू लागला. यातूनच एक भयानक कारस्थान जन्माला आलं. ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. शिल्पा खेमका या कोचिंग क्लासमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती. याच दरम्यान तिची मोहम्मद शकीलबरोबर ओळख झाली. शकील आणि शिल्पा दोघांच्या कॅफेमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. नवरा वाटेत अडथळा ठरत असल्यामुळे तिने त्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला.

मोहम्मद शकीलला परदेशात जायच होतं. त्यासाठी त्याने तिथे क्लास लावलेला. राजस्थानच्या हनुमानगढमधील हे प्रकरण आहे. शिल्पाने या गुन्ह्यामध्ये प्रियकराच्या मित्राची मदत घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी सांगितलं की, शिल्पाने नवऱ्याची हत्या करण्यासाठी प्रियकराच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली होती. तिने आधी नवऱ्याच्या दूधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर नवरा गाढ झोपेत असताना प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बोलवून नवऱ्याची हत्या केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -