Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगपार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म, संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन;...

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म, संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन; आज इतिहासात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशाचे दहावे आणि दलित समाजाचे पहिले राष्ट्रपती के आर नारायणन यांचा आज जन्मदिन. तसेच आजच्याच दिवशी कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म झाला होता. 27 ऑक्टोबर 1937 मध्ये किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन झाले. 1795 मध्ये अमेरिका आणि स्पेनमध्ये करार, मिसिसिपी नदीमध्ये वाहतुकीला परवानगी . शिलाई मशिनचा शोध लावणाऱ्या आयझॅक मेरिट सिंगरचा जन्म झाला होता. पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तयार तयार करण्यात आली होती. 2021 अग्नी 5 चे यशस्वी परीक्षण करण्यात आले.

भास्कर रामचंद्र तांबे 27 ऑक्टोबर 1874 मध्ये झाला. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी त्यांचा परिचय झाला होता. तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता 1935 मध्ये प्रकाशित झाली.. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. आजोळ गाव देवास होते. देवासला भा. रा. तांबे यांच्या कवितेची जन्मभूमी असल्याचाही मान आहे.

1904: स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म
जतींद्रनाथ दास एक भारतीय क्रांतिकारी होते. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1904 मध्ये कलकत्ता येथे झाला. भगत सिंग आणि इतर क्रांतीकारकांसोबत जतिंद्रनाथ दास यांना लाहोर कटात अटक करण्यात आली होती. तुरुंगात सुरू असलेल्या भेदभावाविरोधात, अमानवीय वागणुकीविरोधात भगत सिंह आणि इतर क्रांतिकारकांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. यामध्ये जतिंद्रनाथ यांचाही सहभाग होता. ब्रिटिशांनी हे उपोषण मोडून काढण्यासाठी क्रांतिकारकांवर बळाचा वापरही केला. मात्र, उपोषण सुरूच राहिले. या उपोषणादरम्यान प्रकृती ढासळल्याने जतिंद्रनाथ दास यांचे 63 व्या दिवशी निधन झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -