Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगप्रियांका गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीका भोवणार? निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीका भोवणार? निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीका भोवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने प्रियांकांना नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.

प्रियांका गांधी राजस्थानच्या दौसामधील सभेत बोलताना म्हटल्या की, जेव्हा पंतप्रधान मोदींनी मंदिराला दिलेल्या देणगीचा लिफाफा उघडला तेव्हा त्यात फक्त 21 रुपये आढळले. याबाबत भाजपने प्रियांका गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. भाजपने प्रियांका गांधींच्या भाषणाचा व्हिडिओही त्यात समाविष्ट करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -