Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगकेंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा लॉटरी, डीएनंतर आता HRA 'इतक्या' टक्क्याने वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा लॉटरी, डीएनंतर आता HRA ‘इतक्या’ टक्क्याने वाढणार

 

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नुकतीच वाढ केली आहे. आता सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या HRA (House Rent Allowance) मध्ये वाढ करू शकते.दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस, डीए आणि थकबाकी जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ४६ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. महागाई भत्ता वाढीनंतर आता HRA मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचारी पुन्हा मालामाल होतील.

 

डीएनुसार कर्मचाऱ्यांच्या हाउस रेंट अलाउंसमध्ये सुधारणा केली जाते. एचआरएच्या श्रेणी प्रत्येक शहरात भिन्न असतात. सध्या सिटी एक्समधील लोकांना २७ टक्के, शहर वायमधील लोकांना १८ टक्के आणि सिटी झेडमधील लोकांना ९ टक्के दराने एचआरए मिळतो.

 

 

एका रिपोर्टनुसार , महागाई भत्ता वाढीनुसार एचआरएमध्ये सुधारणा केली जाईल. त्याची पुढील पुनरावृत्ती २०२४ मध्ये होणार आहे. जानेवारीच्या सुरुवातीला त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एचआरएमध्ये पुढील सुधारणा ३ टक्के होईल, असे गृहीत धरले जाते.

 

सध्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त २७ टक्के दराने HRA मिळत असून, तो ३ टक्के वाढून ३० टक्क्यांपर्यंत येऊ शकतो. एक्स श्रेणीत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना २७ टक्के एचआरए मिळत आहे, तर डीए ५० टक्के असल्यास HRA ३० टक्के होईल. त्याचबरोबर वाय श्रेणीतील लोकांसाठी ते १८ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. झेड श्रेणीतील लोकांसाठी हा दर ९ टक्क्यांवरून १० टक्केवर जाईल.

 

५० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश X श्रेणीत करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मेमोरँडमनुसार, जर डीए 50 टक्के ओलांडला तर एचआरए ३० टक्के, २० टक्के आणि १० टक्के होईल.

 

नुकतीच सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली आहे. सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. आता कर्मचाऱ्यांना ४६ टक्के दराने डीए मिळणार आहे. याशिवाय जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे थकबाकीस्वरूपात मिळणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -