Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगAmazon Prime सबस्क्रिप्शन प्लॅन झाले स्वस्त, किंमत तब्बल 500 रुपयांनी कमी

Amazon Prime सबस्क्रिप्शन प्लॅन झाले स्वस्त, किंमत तब्बल 500 रुपयांनी कमी

 

OTT ची क्रेझ आता वाढतंच चालली आहे. यासाठी प्रेक्षकांना OTT प्लॅन्सचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. Amazon प्राइम सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत कमी करण्यात आली आहे. मात्र, ही किंमत कपात मर्यादित काळासाठी आहे.म्हणजेच, तुम्ही या ऑफरचा लाभ काही काळासाठीच घेऊ शकता. सध्या Amazonवर Amazon Great Indian Festival Sale 2023 सुरु आहे.

 

सेल दरम्यान, ई-कॉमर्स दिग्गज केवळ त्याच्या प्रोडक्ट्सवरच सूट देत नाही, तर त्याच्या प्राइम सबस्क्रिप्शनवर देखील सूट देण्यात येते. Amazon प्राइम सदस्यांना अनेक विशेष फायदे दिले जातात. Amazon Prime चा मासिक प्लॅन 299 रुपयांचा आहे. लक्षात घ्या की, Amazon Prime च्या 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे. मात्र, सेलदरम्यान तुम्हाला हे सबस्क्रिप्शन खूपच स्वस्त दरात मिळेल. बघा सविस्तर-

Amazon Prime सबस्क्रिप्शन प्राईस कट

 

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत 1,499 रुपये आहे. यामध्ये यूजर्सना पूर्ण 1 वर्षाची वैधता दिली जाते. Amazon GIF Sale 2023 दरम्यान, कंपनीने आपल्या सदस्यता प्लॅनची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. आता युजर्सना फक्त 999 रुपयांमध्ये Amazon प्राइम सबस्क्रिप्शन मिळेल. लक्षात ठेवा की, ही लिमिटेड टाइम ऑफर आहे. ऑफर संपल्यानंतर Amazon प्राइम सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत पुन्हा 1,499 रुपये होईल.नव्या ऑफरचा लाभ कसा घ्याल?

 

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Amazon App उघडा. तुम्हाला वरच्या बाजूला अनेक कॅटेगरी दिसतील.

यामध्ये तुम्हाला डील्सच्या शेजारी प्राईम सेक्शन सिलेक्ट करायचा आहे. Amazon प्राइम सबस्क्रिप्शनवर उपलब्ध ऑफर तुम्ही याठिकाणी बघू शकता.

आता तुम्हाला प्रथम Try Prime Free चा पर्याय दिसेल.

हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला प्राइम सबस्क्रिप्शन 30 दिवसांसाठी पूर्णपणे मोफत मिळेल.

मात्र, 30 दिवसांसाठी प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत तुमच्या खात्यातून आपोआप वजा केली जाईल.

दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला प्राइमचा एका वर्षाचा सबस्क्रिप्शन प्लॅन दिसेल, ज्याची किंमत 1,499 रुपये आहे.

मात्र ऑफर अंतर्गत, तुम्हाला हा प्लॅन 500 रुपयांनी स्वस्त मिळेल, ज्यामध्ये त्याची किंमत 999 रुपयांपर्यंत कमी होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -