Sunday, July 27, 2025
Homeसांगलीसांगली: प्रेमाचे नाटक करुन व्यापाऱ्याला चार लाखाचा गंडा

सांगली: प्रेमाचे नाटक करुन व्यापाऱ्याला चार लाखाचा गंडा

 

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत एका व्यापार्‍याला चार लाखाचा गंडा गुजरातच्या तरूणीने घातला. या प्रकरणी संबंधित युवती विरूध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगलीतील व्यापारी हिमांशू वैद्य (वय ३६) यांनी प्रियंका शर्मा (रा. सूरत, गुजरात) या तरूणीविरूध्द फसवणुकीची तक्रार सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.संशयित तरूणींने वैद्य यांच्याशी टॅगो लाईव्ह स्ट्रिम अ‍ॅण्ड व्हीडीओ चॅट या अर्निंग अ‍ॅपवर ओळख वाढवली. या ओळखीने विश्‍वास संपादन करून प्रेमाचे खोटे नाटक करीत लग्न करण्याचे आमिष दाखवले. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत संशयित तरूणीने प्रेमाच्या आणाभाका घेत वैद्य यांच्याकडून ४ लाख ६ हजार रूपयांचे क्वाईन भेट स्वरूपात स्वीकारले. गिप्ट क्वाईन स्वरूपात आर्थिक फसवणूक केली असल्याचे वैद्य यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -