ताजी बातमी ऑनलाईन टीम
अचानक कांद्याचे दर वाढले आहेत. 30 रुपये किलोवरुन कांदा 90 रुपये प्रती किलोवर पोहचला आहे. दिवाळी आधीच कांदा महागल्याने सर्व सामान्यांचे बजेट कोडमडले आहे. दोन दिवसात कांद्याची ही दरवाढ झाली आहे. मुंबईत कांदा प्रति किलो 90 रुपये दराने विकला जात आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात कांद्याची ही दरवाढ पहायला मिळत आहे. दिल्लीत कांद्याचा दर 80 रुपये प्रति किलो इतका आहे.
नवरात्री उत्सवानंतर अचानक कांद्याची मागणी वाढली आहे. नवरात्रीपूर्वी मुंबई, दिल्लीसह भारतातील वेगवेगल्या शहरांमध्ये कांदा 20 ते 40 रुपये किलोने विकला जात होता. मात्र, आता काद्यांचे दर गणाला भिडले आहेत. मुंबई सारख्या शहरामध्ये किरकोळ बाजारात कांदा कांदा प्रति किलो 90 रुपये दराने विकला जात आहे. तर, दिल्लीत कांद्याचा दर 80 रुपये प्रति किलो इतका आहे. अचानक कांद्याच्या दरात सरासरी 40 रुपयांपर्यंतची दरवाढ झाली आहे. कांद्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
राजधानी दिल्लीत कांद्याच्या दरांत 25 ते 50 टक्के वाढ झाली आहे. दिल्लीत कांदा 50 ते 70 रुपये किलो दराने विकला जात आहे. खरिपात कांद्याच्या लागवडीखाली क्षेत्र घटल्यानं दर वाढले असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. नाशिकच्या अभोणा इथल्या खासगी बाजार समितीत 6 हजार तर पिंपळगाव बाजार समितीत कांद्याची साडेपाच हजार प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. किरकोळ बाजारात देखील कांदा 50 रुपये किलोने विक्री होत आहे. नाशिकच्या अभोणा इथल्या खासगी बाजार समितीत 6 हजार तर पिंपळगाव बाजार समितीत कांदा साडेपाच हजार प्रतिक्विंटल दराने विक्री झालाय. किरकोळ बाजारात देखील कांदा 50 रुपये किलोने विक्री होतोय.
30 वरुन डायरेक्ट 90 रुपये किलो; कांद्याचे दर अचानक इतके कसे वाढले?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -