ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या युती आघाड्यांनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. सुरुवातीला महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडत भाजपला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.
आज महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. ‘महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपच्या महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधानी नवी दिल्ली दौऱ्यावर होते. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची चर्चा झाली. परंतु याच भेटीत काही नव्या समीकरणांवर चर्चा झाली असावी, अशी अटकळ राजकीय जाणकार बांधत आहेत.
देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपच्या ट्विटने खळबळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -