सलग पाच सामने जिंकून टीम इंडियाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशसह बलाढ्य न्यूझीलंड संघाला पराभवाची धूळ चारली आहे. आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी इंग्लंड संघासोबत होणार आहे. मात्र, या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
आता टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी इंग्लंड संघासोबत होणार आहे. मात्र, या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे टीम इंडियाला (Team India) धक्का बसण्याचं प्रमुख कारण पाकिस्तान आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये रंगदार सामना झाला. क्रिडाप्रेमींचा श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर १ विकेट्सनी विजय मिळवला.
पाकिस्तानचा यंदाच्या वर्ल्डकपमधील (ICC World Cup 2023) हा सलग चौथा पराभव ठरला. दरम्यान, पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. या सामन्याआधी भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता. भारताचे ५ सामन्यात १० गुण आहेत.
तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या नावावर ६ सामन्यात १० गुण जमा झाले आहेत. नेटरनरेट चांगला असल्याने आफ्रिकेने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. येत्या रविवारी म्हणजेच २९ ऑक्टोबरला भारतीय संघाचा सामना इंग्लंडसोबत (IND vs ENG) होणार आहे.
या सामन्यात विजय मिळवून भारताला पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी मिळेल. पण जर इंग्लंडबरोबर पराभव पत्करावा लागला तर भारताला पुन्हा अव्वल स्थान गाठता येऊ शकणार नाही. सध्याच्या घडीला तरी भारताला हा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करतो? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.