मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसात सुटेल असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार साधक-बाधक विचार करत आहे राज्य सरकार अत्यंत कळकळीनं या विषयावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच भेटेल असंही सावंत म्हणाले. तुळजापूर मध्ये आरोग्य विभागाच्यावतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तानाजी सावंत यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
मराठा आरक्षण तीव्र
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आलीये. यातून विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारही सुटलेले नाहीत. अशातच मराठा आरक्षणावरुन अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. आरक्षण न मिळाल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा इशारा निलेश लंकेंनी सरकारला दिलाय. मावळमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ सुरु असलेल्या आंदोलनात निलेश लंके सहभागी झाले. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींविरोधात मराठा समाजाचा रोष दिवसेंदिवस वाढतोय.त्यामुळे हा रोष कमी करण्यासाठी सत्तेतील मराठा लोकप्रतिनिधीच आंदोलनात सहभागी होऊन सरकारविरोधी भूमिका घेताना दिसून येतायत.
आताची मोठी बातमी! ‘मराठा आरक्षणाचा विषय येत्या दोन दिवसात सुटेल’ मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -