Monday, February 16, 2026
Homeब्रेकिंगशिवसेना आमदार संतोष बांगर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार? ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेना आमदार संतोष बांगर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार? ऑडिओ क्लिप व्हायरल

ताजी बातमी ऑनलाईन टी

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूर्मीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांकडून नेतेमंडळींना आता काळे झेंडे दाखवले जात आहेत. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी मराठा कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. संतोष बांगर यांना फोन करणारी व्यक्ती स्वत:ची ओळख आपण मराठा कार्यकर्ता असल्याची करुन देतो. तसेच आपलं नाव रमेश पाटील असल्याचं सांगतो.

मराठा कार्यकर्ते रमेश पाटील संतोष बांगर यांना मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर संतोष बांगर हो, असं उत्तर देतात. दोघांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पण या ऑडिओ क्लिपची ताजी बातमी वर’ पुष्टी करत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -