Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगमोठी रेल्वे दुर्घटना, दोन पॅसेंजर ट्रेनची धडक; 6 जण ठार तर, 40...

मोठी रेल्वे दुर्घटना, दोन पॅसेंजर ट्रेनची धडक; 6 जण ठार तर, 40 हून अधिक जण जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. आंध्र प्रदेशमध्ये भीषण रेल्वे अपघात घडला आहे. दोन पॅसेंजर ट्रेनची धडक झाल्याने 4 डबे रेल्वे मार्गावरुन घसरले. या भीषण दुर्घटनेत  6 जण ठार तर, 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. या रेल्वे अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 18 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कोठावलसा मंडळातील अलमांडा-कंथकपल्ली येथे हा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. ओव्हरहेड केबल तुटल्याने रायगड पॅसेंजर ट्रेन रुळावरच थांबली होती. मात्र, त्याचवेळी आलेल्या पलासा एक्स्प्रेसने रायगड एक्सप्रेसला धडक दिली. रायगड पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर,  40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -