ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरु आहे. मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. सोमवारी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून दिले होते. त्यानंतर प्रशांत बंब यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. यामुळे बीड आणि धारशिवमध्ये बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी एसआरपीएफचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान राज्यातील परिस्थितीचा आढवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घेतला. ज्या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संचार बंदी आणि कलम १४४ चा वापर करण्याबाबत चर्चा या बैठकीत झाली.
कर्नाटक आगाराच्या बसला आग कर्नाटक आगाराच्या बसला अज्ञात इसमाने आग लावली. बसमध्ये ३९ प्रवाशी होते. त्या सर्वांना आणि चालक, वाहकास खाली उतरवून आग लावण्यात आली. ही घटना बीडमधील उमरगा येथे घडली. राज्यातील परिस्थितीमुळे एसटी महामंडळाने मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस रद्द केल्या आहेत. बीडमध्ये srpf चा बंदोबस्त बीडमध्ये आजपासून srpf पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री यांनी मराठवाडातील परिस्थितीचा आढवा जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून घेतला. गरज पडल्यास संपूर्ण मराठवाड्यात srpf आणि इतर बंदोबस्त लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बीड आणि धाराशिव जिल्ह्यात आजपासून संचारबंदीचे आदेश दिले आहे. यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा पोलिस महासंचालकांकडून घेतला. राज्यात ज्या ज्या ठिकाणी उद्रेक झाला आहे, त्याठिकाणी तसेच ज्या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी संचार बंदी आणि कलम १४४ चा वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये, यावर सरकारचा भर असणार आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट आणि आंदोलनाबाबत आक्रमक पोस्ट केल्या जात आहे. यावर सायबर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्याबाबत चर्चा झाली.