मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरु आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. मराठा आरक्षणावर अजून कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे राज्यभरात आंदोलन पेटले आहे.
राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. राज्यातील परिस्थितीचा आढावा पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला. बीड आणि धारशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.