Thursday, July 31, 2025
Homeक्रीडाभारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही? महेंद्र सिंह धोनीचं वर्ल्ड कपबाबत मोठं...

भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही? महेंद्र सिंह धोनीचं वर्ल्ड कपबाबत मोठं वक्तव्य!

भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही? महेंद्र सिंह धोनीचं वर्ल्ड कपबाबत मोठं वक्तव्य!

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने सलग सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताचा विजयरथ रोखणं आता कोणत्याही संघासाठी कठीण असणार आहे. कारण संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम प्रदर्शन करत संघासाठी महत्त्वाची कामगिरी करत आहे.

 

भारताने आता सेमीफायनलमध्ये आपली जागी पक्की केली आहे. यंदा भारतीय संघ वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकायची हे ठरवून आल्याचं दिसत आहे. तशा पद्धतीने संघही कमाल कामगिरी केली आहे. अशातच यावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

 

काय म्हणाला धोनी?

 

भारतीय संघ एकदम संतुलित असून संघातील प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. आताची परिस्थिती पाहता सर्व काही चांगलं होताना दिसत आहे. भारत वर्ल्ड कप जिंकणार की नाही याबाबत बोलताना, मी यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, समजणाऱ्या इशारा पुरेसा असल्याचं महेंद्र सिंह धोनी म्हणाला.

 

एकंदरित धोनीच्या म्हणण्यानुसार वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ इतर संघांपेक्षा संतुलित आणि मजबूत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये टॉप ऑर्डरमधील सर्वच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. कर्णधार रोहित शर्मा सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत विरोधी संघाच्या गोलंदाजांना फोडून काढत आहे.

 

दरम्यान, धोनीने आपल्या नेतृत्त्वात 2011 मध्ये संघाला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. इतकंच नाहीत 2013 साली धोनीने चॅम्पियन ट्रॉफीसुद्धा जिंकली होती. तर 2007 मध्ये धोनीने टी-२० वर्ल्ड कप संघाला मिळवून दिलेला.

 

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -