उपविभागीय अधिकारी तथा (Police Patil Bharti 2023) उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कणकवली अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 134 पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
विभाग – उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कणकवली
भरले जाणारे पद – पोलिस पाटील
पद संख्या – 134 पदे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन (समक्ष)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
09 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता तहसिलदार कार्यालय कणकवली / वैभववाडी / देवगड
नोकरी करण्याचे ठिकाण
ता. कणकवली जि. सिंधुदुर्गअर्ज फी – रु.25/-
परीक्षा फी
1. खुल्या प्रवर्गाकरीता रु. 400/-
2. मागास प्रवर्गाकरीता रु. 300 /-
आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवाराने संबंधित तहसिलदार (Police Patil Bharti 2023) कार्यालयात स्वतः उपस्थित राहुन अर्ज सादर करावा.
3. इतर कोणत्याही प्रकारे / माध्यमाव्दारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
4. उमेदवारांनी अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपूर्ण असल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान पाठविल्या जाणा-या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
5. तसेच ई-मेल आयडी व मोबाईल संदेश वहनात येणा-या तांत्रिक अडचणींना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कणकवली हे जबाबदार असणार नाही.
अधिकृत वेबसाईट – https://sindhudurg.nic.in/