Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगवडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून शिराळ्यात चिमुकला ठार

वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून शिराळ्यात चिमुकला ठार

वडिलांच्या ट्रॅक्टरखाली चिरडून एक वर्षाचा मुलगा ठार झाला. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. वडिलांना अटक झाली आहे.

 

हितेश सिहेनसिंग सिंगार (वय 1) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याची आई किला सिहेनसिंग सिंगार यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

  1. सिहेनसिंग पागला सिंगार (वय 30, रा. भेडदा, मध्य प्रदेश, सध्या रा. शिराळा) हा ट्रॅक्टर (एमएच 10 – एस 5436) जोडलेल्या डंपिंग ट्रॉलीसह पाठीमागे घेत होता. डंपिंग ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या चाकास मुलगा हितेश हा धडकला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यास ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे नेले असता, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संशयित सिहेनसिंगवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -