Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगमुकेश अंबानी धमकी प्रकरणात आणखी एकाला अटक; तेलंगणानंतर गुजरातमध्ये कारवाई

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात आणखी एकाला अटक; तेलंगणानंतर गुजरातमध्ये कारवाई

 

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल पाठवल्याबद्दल दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काल (शनिवारी) अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दावा केला आहे की, गुजरातमधील राजवीर खंत (21) जो मुख्य आरोपी आहे, त्याने 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) वापरून ShadabKhan@fencemail.com या ईमेल आयडीवरून मुकेश अंबानी यांना पाच मेल पाठवले. खंत यांने सुरुवातीला 20 कोटी रुपयांची मागणी केली आणि नंतर उद्योगपतीने त्याच्या मेलला प्रतिसाद न दिल्याने मागणी वाढवून 400 कोटी रुपये केली.अन्य विद्यार्थ्याची ओळख तेलंगणातील गणेश आर वनपारधी(19) असे आहे, ज्याने मीडियामधील धमकीच्या मेलचे वृत्त वाचून एक मेल पाठवला. या प्रकरणातील सहावा धमकीचा मेल त्याच्या ईमेल आयडीवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याने धमकीचा मेल करत 500 कोटींची मागणी केली. वनपारधीला कोर्टात हजर केले असता त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.खंतला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली, तर वनपारधीला गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गुन्हे शाखेने खंत यांचा गुन्ह्यात वापरलेला डेस्कटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. “खंत यांना विश्वास होता की तो पकडला जाणार नाही म्हणून त्याने तपास यंत्रणांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळविण्यासाठी त्याने डार्क वेबवर फिरून ‘शादाब खान’ नावाने आयडी तयार करण्यापूर्वी जवळपास एक आठवडा किमान 650 वेबसाइट शोधल्या होत्या”, याबाबतची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे..खंत हा इंटरनेट शौकीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या नकळत त्याने सोडलेल्या डिजिटल फूटप्रिंटच्या मदतीने त्याचा मागोवा घेण्यात आला. “त्याने धमक्या पाठवण्यासाठी प्रोटॉन मेल (एंड-टू-एंड एनक्रिप्टेड ईमेल सेवा आणि मेलफेन्स (सुरक्षित आणि एनक्रिप्टेड ईमेल सेवा)) वापरला होता. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरला होता ज्याने बेल्जियममधील आयपी पत्ता दर्शविला होता,” याबाबतची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली आहे. .सहपोलिस आयुक्त लखमी गौतम म्हणाले, “मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने 3 सायबर पोलिस युनिट्स आणि सेंट्रल इंटेलिजेंस युनिटमधील निवडक अधिकाऱ्यांच्या मदतीने मेलच्या व्हीपीएन तपशीलांची तपासणी केली आणि खंतचा मागोवा घेतला. त्याला शनिवारी पहाटे त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.” गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला तो पहाटे 3 वाजता इंटरनेटवर सर्फिंग करताना आढळला जेव्हा त्याला अटक करण्यात आली”.अंबानीचे सुरक्षा प्रभारी देवेंद्र मुनसीराम यांच्या तक्रारीवरून 27 ऑक्टोबर रोजी गमदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर खंडणी व धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -