‘सुलताना’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपट (Tiger 3 Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाबाबत दोघांचे देखील चाहते खूपच उत्सुक आहेत.
प्रेक्षकांमध्ये ‘टायगर ३’ची क्रेझ इतकी आहे की या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच १ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग (Tiger 3 Advance Booking) सुरू झाले असून आतापर्यंत निर्मात्यांनी ३३ हजारांपेक्षा जास्त तिकीटं विकली आहेत.
टायगर ३ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला ५ नोव्हेंबर म्हणजे आजपासून सुरूवात झाली. देशातील काही मोठ्या शहरांमध्ये अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. अॅडव्हान्स बुकिंगमधून निर्मात्यांनी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच १ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी ही एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे.
आगाऊ बुकिंगवरूनच हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कलेक्शन करू शकतो याचा अंदाज येऊ शकतो. अॅडव्हान्स बुकिंगवरून सलमान खान येत्या काही दिवसांत चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान व्यतिरिक्त कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान आणि हृतिक रोशन कॅमिओ करताना दिसणार आहेत. ‘टायगर 3’ चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.