Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाIND vs SA | जडेजाचा ‘पंच’, कोहलीचं शतक, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर...

IND vs SA | जडेजाचा ‘पंच’, कोहलीचं शतक, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने सलग आठवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाचा 243 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाला विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकाने गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकाला 27.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 83 धावाच करता आल्या. रविंद्र जडेजा आणि विराट कोहली हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच इतरांनीही चांगलं योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकाची बॅटिंग
टीम इंडियाच्या भेदक, धारदार आणि फिरकी बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकाचे फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकाच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर चौघांनी 10 पेक्षा अधिक धावा केल्या. मार्को जान्सेन याने सर्वाधिक 14 रन्स केल्या. रॅसी व्हॅन डर ड्युसेन याने 13 धावा जोडल्या. कॅप्टन टेम्बा बावुमा आणि डेव्हिड मिलर या दोघांनी प्रत्येकी 11 धावांचं योगदान दिलं. लुंगी एन्गिडी झिरोवर आऊट झाला. तर तरबेझ शम्सी 4 धावांवर नाबाद परतला.

जडेजाचा दक्षिण आफ्रिकाला पंच
टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी 5 विकेट्स घेणारा दुसरा स्पिनर ठरला. जड्डूने 9 ओव्हरमध्ये 33 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव या जोडीने 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकाला पद्धतशीर गुंडाळलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -