Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगआतापर्यंतच्या निकालात कोण आघाडीवर?

आतापर्यंतच्या निकालात कोण आघाडीवर?

 

 

महायुतीचा आतापर्यंत 199 ग्रामपंचायतींवर विजय

 

आतापर्यंत महायुतीचा 199 ग्रामपंचायतींवर विजय झाला आहे. भाजप आणि अजीत पवार गटामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा आतापर्यंत 69 ग्रामपंचायतीवर विजय झाला आहे.

 

ग्रामपंचायत निवडणूक निकालात अजीत पवार गट सर्वात पुढे आहे. कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळायला सुरूपात झाली आहे. अजीत पवार गटाच्या पाठोपाठ भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

सीमा खोत यांची चांदेकरवाडीच्या सरपंचपदी निवड करण्यात आलेली आहे. कोल्हापूरात ठाकरे गटाने खाते उघडले आहे. सोलापूरमधील दोन ग्रामपंचायती या भाजपाकडे आहे.

 

राधानरगरीमधील चांदेकरवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. तर, करवीरमध्ये शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला आहे. नाशिकच्या 48 गावातील ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी होणार आहे. नाशिकमधील 4 ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहे. पुण्याच्या खेड तालूक्यात सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

 

नागपूर जिल्ह्यातील 361 ग्राम पंचायतींचे निकाल लागणार आहेत. मतमोजणीला काही वेळात होणार सुरुवात. 1224 मतदार केंद्रांवर जवळपास 85 टक्के मतदान झालं. सरपंचपदासाठी 1186 उमेदवार मैदानात होते, तर सदस्य पदासाठी 6882 उमेदवार निवडणूक मैदानात होते.

 

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे.

 

– धुळ्यात 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात. धुळे, शिंदखेडा ,साखरी ,शिरपूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार.

 

– कोल्हापूर जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायती आणि अकरा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात.

 

– करवीर तालुक्यातील 13 गावांची मतमोजणी कोल्हापुरातील शासकीय गोदाम

परिसरात पार पडणार.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -