सन 2023 हे वर्ष संपायला आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते वांगेलिया पांडेवा गुश्टेरोवा ऊर्फ वेंगा बाबा यांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे.नविन वर्षात पृथ्वीची दिशा भरकटू शकते. तसेच कॅन्सरच्या इलाजाबाबत बाबा वेंगा याने भविष्यवाणी केलेली आहे. 2024 बाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे.
कोण आहे बाबा वेंगा?
बाबा वांगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. नेत्रहीन असलेल्या वेंगा बाबांचा 1996 साली मृत्यू झालाय. मात्र त्याआधीच त्यांनी या भविष्यवाणी करून ठेवल्यात. विशेष म्हणजे ही भाकितं कुठेही लिखित स्वरुपात नाहीत. आपल्या शिष्यांना त्यांनी हे सगळं भविष्य ऐकवलंय. त्यांचे काही आडाखे खरे ठरले, तर काही चुकीचे निघालेत.बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक खरे ठरल्या आहेत. बाबा वांगा यांनी मृत्यूपूर्वी 5079 पर्यंत भविष्यवाणी वर्तवली आहेत. बाबा वांगा यांच्या अंदाजांपैकी 85 टक्के पर्यंत भविष्यवाणी खरी ठरली आहे.
2024 बाबत बाबा वेंगाची खतरनाक भविष्यवाणी
2024 बाबत बाबा वेंगाने खतरनाक भविष्यवाणी केली आहे. 2024 मध्ये हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि भूकंपामुळे पृथ्वीची स्थिती बिकट होणार असल्याचं भाकित बाबा वेंगाने केले आहे.
पुतिन यांची हत्या होणार?
2024 मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या होवू शकते असे भाकित बाब वेंगान केले आहे. पुतिन यांच्याच देशातील कोणीतरी त्यांची हत्या करेल, असा अंदाज बाबा वेंगा यांनी व्यक्त केला आहे.
युरोपमध्ये दहशतवादी हल्ले
2024 या वर्षात युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होतील. पुढच्या वर्षी एखादा मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी घेईल किंवा तो हल्ला करेल असा दावा बाबा वेंगाने केलेला आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून युरोपातील विविध शहरांमध्ये हल्ले केले जातील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
जग आर्थिक संकटात सापडेल
2024 मध्ये जगावर एक मोठे आर्थिक संकट येईल, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल.
पृथ्वीवर हवामान संकट
2024 या वर्षात पृथ्वीवर हवामान संकट येईल. नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानाचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील.
पृथ्वीची दिशा बदलणार
पृथ्वीच्या कक्षेत बदल होवू शकतो. यामुळे हवामान बदलाचे भयानक परिणाम दिसून येतील. तसेच रेडिएशनचा धोका निर्माण होईल.
सायबर हल्ला
2024 वर्षात जगात सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढणार आहे. हॅकर्स पॉवर ग्रीड्स आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट्ससारख्या बेसीक पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील. यामुळे राष्ट्रीय स्तरावर सुरक्षेला धोका निर्माण होईल, असा अंदाज बाबा वेंगा यांनी व्यक्त केला आहे.
कर्करोगावर उपचार
2024 या वर्षात वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होवू शकते असे भाकित बाबा वेंगा याने केले आहे. अल्झायमरसह असाध्य आजारांवर नवीन उपचार उपलब्ध होणार आहेत. 2024 मध्ये कॅन्सरवर उपचार करणे शक्य होईल असे भाकितबी बाबा वेंगाने केले आहे.
तंत्रज्ञानात क्रांती होईल
2024 मध्ये क्वांटम कंप्युटिंगमध्ये मोठा शोध लागेल. क्वांटम कंप्युटिंग वेगाने विकसित होत आहे. यामुळे जलदगतीने समस्या सोडवता येऊ शकतात. एआय आणखी र्गती करेल.