Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगशाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचं ठरलं! या तारखेपर्यंत असणार सुट्या, वाचा सविस्तर...

शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचं ठरलं! या तारखेपर्यंत असणार सुट्या, वाचा सविस्तर…

सहामाही परीक्षा संपल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांकडील सुट्यांच्या यादीनुसार शाळांना ८ ते २३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्या अपेक्षित आहेत. मात्र, ९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या मिळाव्यात, अशी मागणी शिक्षकांसह काही संघटनांची आहे.

 

२५ नोव्हेंबरपर्यंत सुट्या मिळाल्यास पुढील दोन दिवस सलग सुट्या मिळतील, असाही त्यामागील हेतू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाकडून उद्या (सोमवारी) त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

 

शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्यानंतर वर्षातील ३६५ दिवसांत ७६ सुट्या अपेक्षित आहेत. त्याशिवाय जास्त दिवसांची सुटी नको, असा शासकीय नियम आहे. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच शासनाकडून सार्वजनिक सुट्यांची यादी प्रसिद्ध केली जाते.

 

यंदाच्या दिवाळीसाठी ८ ते २३ नोव्हेंबर या काळात सुट्या आहेत. मात्र, ९ नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरवात होणार असून त्यादिवशी वसुबारस आहे. त्यामुळे ९ ते २५ नोव्हेंबर या काळात दिवाळी सुट्या मिळाव्यात, अशी मागणी शिक्षक व काही शिक्षक संघटनांनी केल्याचे बोलले जात आहे. ठरल्याप्रमाणे दिवाळी सुट्या मिळाल्यास शुक्रवार व शनिवारी दोन दिवस शाळेत येऊन पुन्हा रविवार, सोमवारी दोन दिवस सलग सुट्या आहेत. त्यामुळे तशी मागणी होत असल्याची चर्चा आहे.

 

परंतु, त्या मागणीनुसार शाळांना दिवाळीच्या सुट्या कधीपासून कधीपर्यंत द्यायच्या, याबद्दलचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

 

सुट्यांचे गणित जुळवावे लागणार

 

एका शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांचे दिवस ७६ असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय एक जरी सुट्टी जास्त झाल्यास त्या दिवसाचा पगार वसूल होऊ शकतो. त्यामुळे दिवाळी सुट्यांचा निर्णय घेताना आतापर्यंतच्या सुट्या व पुढील सुट्यांचे गणित जुळवावे लागणार आहे. त्यानुसार आता उद्या (सोमवारी) होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या काही शाळांची सहामाही परीक्षा संपली असून काही शाळांच्या परीक्षा बुधवारी (ता. ८) संपणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -