Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात बनावट देशी दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा; तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल...

कोल्हापुरात बनावट देशी दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा; तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

राज्य उत्पादन शुल्कची पाडळी खुर्द गावात कारवाई; दोघांना अटक :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावात शनिवारी रात्री छापा टाकला. बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यातून मद्य (alcohol) तयार करण्यासाठी लागणारे साहित्य स्पिरिट , रिकाम्या बाटल्या, लेबल , टोपण असा अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच चार लाखाची कार असा 15 लाख 14 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला . अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

पाडळी खुर्द गावात एक इसम बनावट (alcohol) दारू तयार करतो , यासाठी लागणारे साहित्य त्याने जमवले आहे . गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा हा बेकायदेशीर उद्योग सुरू आहे, अशी माहिती खबऱ्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाला समजले होती .त्यामुळे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश भरारी पथकाला दिले होते.भरारी पथकातील उपाधीक्षक राजाराम खोत , निरीक्षक पांडुरंग पाटील , संभाजी बर्गे ‘ जगन्नाथ पाटील ,नंदकुमार देवणे , पंकज कुंभार ,राजू दिवसे .अशोक साळुंखे ,विजय नाईक आदींच्या पथकाने शनिवारी रात्री पाडळी गावात छापा टाकला . या ठिकाणी दारू तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले, त्यानुसार दारू तयार करणारा संशयित परशराम उर्फ पिंटू कुबेर केसरकर ( वय 40 रा . नांगनूर , ता . चिकोडी , जि. बेळगाव , राज्य कर्नाटक) तसेच दुसरा संशयित ओमप्रकाश माताप्रसाद शुक्ला ( वय ५२ रा चिंचवड रोड गांधीनगर) या दोघांना अटक केली . तर तिसरा संशयित अध्याप सापडलेला नाही . या ठिकाणाहून पथकाने दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट , अर्क , स्वाद , विविध ब्रँडच्या नावाचे लेबल, टोपण , बाटल्या , बॉक्स , सिलिंग साठी लागणारे मशीन , मद्याची तीव्रता मोजण्यासाठी लागणारे उपकरण असे जवळपास 11 लाख रुपयांचे साहित्य जप्त केले. त्याचबरोबर चार लाख रुपये ची कार ही जप्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -