Friday, January 31, 2025
Homeब्रेकिंगदेशाला लागलेली उत्सुकता अखेर संपली, शुभमन गिल कुणाला डेट करतोय, साराने नाव...

देशाला लागलेली उत्सुकता अखेर संपली, शुभमन गिल कुणाला डेट करतोय, साराने नाव फोडलं!

सध्या करण जोहरच्या (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan 8) या कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी हजेरी लावली होती.

 

यावेळी दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये आता सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांनी हजेरी लावणार आहेत. नुकताच कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सारा ही शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्या डेटिंगबाबत बोलताना दिसत आहे.

 

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, करण जोहर हा सारा अली खानला तिच्या आणि शुभमन गिल यांच्या डेटिंगच्या चर्चेबाबत विचारतो. त्याबद्दल बोलताना सारा म्हणते, ‘सगळं जग चुकीच्या साराच्या मागे लागलं आहे.’ सारानं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे एकमेकांना डेट करत आहेत, असं कॉफी विथ करणमध्ये सांगितलं आहे.

 

कॉफी विथ करण या शोच्या प्रोमोमध्ये सारा ही अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटिंगबाबत देखील बोलताना दिसत आहे. कॉफी विथ करणमध्ये करण जोहर हा साराला विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे जी अनन्याकडे आहे पण तुझ्याकडे नाहीये. या प्रश्नाचं उत्तर देत सारा म्हणते, ‘द नाइट मॅनेजर.’ साराच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. द नाइट मॅनेजर या वेब सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यामुळे सारानं आदित्य रॉय कपूरचं थेट नाव न घेता अनन्या आणि त्याच्या डेटिंगबाबत सांगितलं आहे.

 

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये शुभमन गिलला ‘तू साराला डेट करतोय का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होताय या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला होता, ‘सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.’ पण तेव्हा शुभमन नेमकं कोणत्या साराबद्दल बोलत होता, हे प्रेक्षकांना कळाले नव्हते पण आता कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये सारा अली खाननं अप्रत्यक्षरित्या शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या डेटिंगबाबत सांगितलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -