Wednesday, July 30, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत महानगरपालिकेतर्फे 'स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' उपक्रम राबविणार

इचलकरंजीत महानगरपालिकेतर्फे ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ उपक्रम राबविणार

राज्य शासनाच्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ या परिपत्रकाच्या आधारे इचलकरंजी शहरातसुध्दा सदरचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या उपक्रमामध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महानगरपालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या विकासकामांचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दिवटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, दैनंदिन दिवसापेक्षा दिवाळीमध्ये कचऱ्याचे प्रमाण दुप्पट होते. त्याचबरोबर प्रदुषणातही मोठी वाढ होते. त्या अनुषंगाने स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. त्यामध्ये नव्याने स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून त्या संदर्भातील सर्टीफिकेट डाऊनलोड करुन घ्यावे. वीज बचतीच्या दृष्टीने शासनाने अपारंपारिक ऊर्जास्त्रोताकडे वळण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार राजाराम स्टेडीयम, घोरपडे नाट्यगृह, जलतरण तलाव आणि शाळांच्या इमारती याठिकाणी सोलर पॅनल बसवून | वीज बचतीचा मानस आहे. शहरातील प्रमुख चौक हायमास्ट दिव्यांनी उजळण्यासाठी १० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काही उपाययोजना दृष्टीक्षेपात आहेत. त्यामध्ये शहरातील महापालिका मालकीच्या जागा विकासकामांच्या माध्यमातून बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतर करा ) तत्वाद्वारे विकसित करण्याचे धोरण आखण्यात येणार आहे. त्या दृष्टीने विकली मार्केटचा अभ्यास केला जात असल्याची माहिती आयुक्त दिवटे यांनी दिली.

आपला सहभाग नोंदवावा. दिवाळी पर्यावरण पुरक साजरी करावी तसेच पर्यावरण पुरक उपक्रमाबाबत व्हीडीओ अपलोड करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील दैनंदिन स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी या विभागाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी १ डिसेंबरपासून एक वेगळी सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सिस्टिमद्वारे कर्मचाऱ्यांची हजेरी, स्वच्छता व कचरा उठाव आणि त्या संदर्भातील वाहतूक करणार्या वाहनांची माहिती अपडेट केली जाणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेकडील कोणत्याही तक्रारीची नोंद करण्यासाठी लवकरच व्हॉटस्अॅप नंबर जारी केला जाणार आहे. त्याचा नागरिकांना चांगला लाभ होणार आहे. दिवाळी काळातही कोणतीही तांत्रिक अडचण न आल्यास एकदिवसआड पाणी देण्यात येईल, असेही आयुक्त दिवटे यांनी सांगितले. अनुकंपा तत्वावरील वारसांना नोकरीत घेण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून त्यांना लवकरच सेवेत रुजू करुन घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -