Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी सह जिल्ह्यात अवकाळी पाऊस.. बाजारपेठेमध्ये त्रेधातिरपट

इचलकरंजी सह जिल्ह्यात अवकाळी पाऊस.. बाजारपेठेमध्ये त्रेधातिरपट

 

 

हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.इचलकरंजी सह जिल्ह्यात अवकाळी पाऊस.. बाजारपेठेमध्ये त्रेधातिरपट  या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप या गावी रात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

 

मंगळवारी रात्री वातावरणात बदल होऊन अचानक पाऊस सुरु झाला. या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्येच अडकला आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागायतदारांना सुद्धा या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. जिल्हयात पुन्हा पाऊसाची शक्यता आहे. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस भागात पहाटेपासून अवकाळी पाऊस तर जत तालुक्यातील उमदी भागात देखील पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगाचा धोका आहे.

 

कोल्हापूरच्या राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बुधवारी पहाटे जोरदार पाऊस बरसला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी मळणीसाठी भात पिक शेतात ठेवला होता. त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -